Breaking

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव,या संस्थेच्या पाच ही शाळेला मराठी डी,जी, ॲप विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली*


*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव,या संस्थेच्या पाच ही शाळेला मराठी डी,जी, ॲप विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली*


एस.एस.इंजिनियर्स पुणे श्री.सहदेव भानुदास भड सर यांचे बंधु श्री.शहाजी भानुदास भड साहेब यांनी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर या संस्थेच्या पाच ही शाळेला मराठी डी.जी अँप हे सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोफत दिले आहे.आज पुस्तक ही सर्व शाखेतील मुलांना मिळाले आहेत.एस.एस.साहेबांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.विनायकराव गरड व उपाध्यक्ष श्री.विश्वनाथ (बापु) काकडे प्र.सचिव श्री.पंडित (तात्या) लोहोकरे,सर्व संचालक मंडळ यांनी आभार व्यक्त केले आहे.तसेच सर्व शाखांचे प्रमुख श्री.आप्पासाहेब प्रतापराव कुतवळ (प्राचार्य,म.प.आ.न्यू.इंग्लिश.मा.व उच्च माध्यमिक स्कूल गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर) , विलास लोहोकरे,तसेच मुख्याध्यापक श्री.उमेश पाटील सर,श्री.भड मनोज भास्कर सर, श्री.बालाजी काकडे सर,लोकसेवा विद्यालयाचे श्रीपत पिंपरी या शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आभार व्यक्त केले.तसेच सर्व शाखेतील शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेत्तर यांनी ही आभार व्यक्त केले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा