मनपा कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड ची धरणे
गुंठेवारी चे शुल्क कमी करण्याची मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड: शासनाने अपात्र एन ए,लेआयुट असलेले खुले भुखंड तसेच बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी ची योजना आणली आहे त्या योजनेच्या शासन निर्णयानुसारच गुंठेवारी ची शुल्क घ्यावी या मागणीसाठी २९ डिसेंबर रोजी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या अनियमीत भुखंड तसेच बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी ची योजना आणली आहे त्यामध्ये हजारो नागरिकांनी सहभागी नोंदविला आहे.शासनाने गुंठेवारी करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जे शुल्क ठरवले होते ते जनतेला परवडणारे नव्हते त्यामुळे शासनाने शासन आदेशाची दुरूस्ती करून आक्टोंबर महिण्यात गुंठेवारी शुल्क कमी केले.नांदेड मनपा प्रशासन शासनाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसुन येत असुन जुन्याच शासन निर्णयानुसार शुल्क घेण्याचा तगादा लावला आहे.जुन्या आणि नव्या शुल्कामध्ये दुपटीचा फरक आहे.गुंठेवारीच्या संचिकेसोबत जर महाराष्ट्र शासनाने जर शुल्क कमी केले तर मी मनपा प्रशासनास फरकाची रक्कम मागणार नाही अशा पद्धतीचा बाॅंड लिहुन घेतल्याजात आहे ही बाब अत्यंत जुलमी असुन मनपा प्रशासनाने नवीन शासन निर्णयानुसार च गुंठेवारी शुल्क आकारावे तसेच गुंठेवारी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे असे निवेदन यावेळी देण्यात आले.
मनपा प्रशासन हाय हाय,जय जिजाऊ जय शिवराय,शासन निर्णयानुसार गुंठेवारी चे शुल्क घेत लेच पाहिजे अशा नार्यांनी महानगरपालिका परिसर आंदोलनामुळे दणाणुन निघाला होता.येत्या आठ दिवसांत गुंठेवारी वर योग्य तो निर्णय झाला नाही तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष भगवान कदम, प्रदीप गुबरे,सिडको अध्यक्ष गजानन शिंदे, परमेश्वर पाटील, आवधुत कदम, अंकुश कोल्हे, नितीन कोकाटे,अशोक कदम,माधव जाधव, सचिन कदम,बालाजी शिंदे व इतरांच्या वतीने देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा