Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

*डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार कार्यक्रम संपन्न*



*डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार कार्यक्रम संपन्न*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*



          नितीमान पिढी घडविणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच आपल्याजवळील ज्ञानाचा व संपत्तीचा उपयोग समाजहितासाठी करणे यातच खरे आत्मिक समाधान आहे. असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आयोजित महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. 
         अध्यक्षस्थानावरुन भिष्माचार्य चांदणे म्हणाले की, आदर्श शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला व सृजनशीलतेला चालना देत असतो.

              *चौकट*  

*भविष्यातील चांगली पिढी घडविण्यासाठी मोबाईलमध्ये सतत मग्न असणाऱ्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना कृतिशील प्रयोगांमध्ये गुंतवून ठेवणे हीच काळाची गरज आहे.*
         *- मनोज राऊत -*
*-गटविकास अधिकारी, करमाळा -*


                    यावेळी विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, शिक्षक नेते बाळासाहेब गोरे, प्रताप काळे, आदिनाथ देवकते, सुरेश शिंदे, रमाकांत गटकळ, चंद्रहास चोरमले, साईनाथ देवकर तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निशांत प्रवीण शिंदे, तन्मय महादेव जगदाळे, ऋषिकेश रामहरी जाधव तसेच एम्स हैदराबाद येथे गोल्ड मेडल मिळविलेला भगवंत गणेश पवार व आयआयटी परीक्षा उत्तीर्ण झालेला वैभव सुहास काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सर्व उपस्थितांना या एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले. संतोष शितोळे यांनी सूत्रसंचालन, अजित कणसे यांनी प्रास्ताविक तर नवनाथ मस्कर यांनी आभार मानले.
                 कार्यक्रमासाठी संघटनेचे चंद्रकांत वीर, शहाजी रंदवे, नवनाथ मस्कर , संतोष शितोळे , प्रविण शिंदे ,पोपट पाटील, दत्तात्रय जाधव, अशोक कणसे, विजय बाबर, संतोष माने, सुधिर माने, महेश निकत, शरद पायघन, सुनिल पवार, अंकुश सुरवसे, विकास माळी, शरद झिंजाडे, मिलिंद डमरे, उमराव वीर, सोमनाथ पाटील, लहू चव्हाण, दादासाहेब माळी, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदींनी परिश्रम घेतले.

 *पुरस्कारप्राप्त शिक्षक*

 कमल वाघ, अर्चना जगताप (अंगणवाडी क्र. ६१, पाडळी), रामहरी ढेरे (उंदरगाव), श्रीराम बुलबुले (बोरगाव), रामहरी गुटाळ (अंजनडोह), महेश आरडे (घरतवाडी), श्रीकृष्ण भिसे (वांगी-१), सुहास गुळवे (वांगी-२), अनिता बारवकर (कोंढारचिंचोली), वनिता बडे (खडकेवाडी), दिप्ती जगताप (देशमानेवस्ती), राणी सातव (मलवडी), प्रज्ञा जोशी (न.प. मुली-२), किशोरकुमार शिंदे (एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, करमाळा), मन्नान मोमीन (हिसरे), बब्रुवाहन मोरे (सावडी), संभाजी किर्दाक (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा).

 *पुरस्कारप्राप्त शाळा*

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी-4.
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोमलवाडी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा