माढा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 3 कोटी निधी मंजूर - आमदार बबनदादा शिंदे
नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत निधीचे वितरण
माढा / प्रतिनिधी - माढा शहरातील नगरपंचायतची प्रशासकीय इमारत बांधणेसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेला 3 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे वितरित केला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले कि, माढा तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व माढा नगरपंचायतीस प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस यापूर्वी 15 कोटी निधी मंजूर झाला आहे. आता माढा शहरातील असलेल्या नगरपंचायत इमारत बांधणेसाठी 3 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असून लवकरच त्याचे टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
पुढे बोलताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले कि,माढा नगरपंचायतीची इमारत 50 ते 60 वर्षे जुनी ग्रामपंचायतीची असल्यामुळे पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी पाणी पाझरते. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होतात. तसेच माढा हे तालुक्याचे ठिकाण आहे.शहराची वाढती लोकसंख्या व शहरात नगरपंचायतीस सुसज्ज अशी सर्व सोयीनीयुक्त इमारत व्हावी या उद्देशाने नगरपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी केलेली होती.त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद करुन नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्टेपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरचा निधी महाराष्ट्र शासन निर्णय क्रं.पूरक/2021प्र.क्रं.94/1नवि16मंत्रालय मुंबई येथील नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे नुकताच वर्ग करण्यात आल्याचे कळविणेत आले आहे.
-चौकट - माढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या माढा आणि महाळुंग/श्रीपूर या नगरपंचायतींना पुढील काळात राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक योजना आदी निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते,गटार, दलित वस्ती सुधारणा करणे यासह अन्य मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी - आमदार बबनराव शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा