*आलेगाव हद्दीत कृषी दुकानदारास आडवून 90 हजार रुपयांचा ऐवज लुटला चार जणांवर गुन्हा दाखल*
************************
टेंभुर्णी(प्रतिनिधी) मोटरसायकलवरून जाणाऱ्या दुकानदारास दोन मोटरसायकलवर येऊन चार युवकांनी मोटरसायकल आडवी लावून मारहाण करत 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आलेगाव तालुका माढा येथील उजनी कॅनाल पट्टीच्या रोडवर घडली याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकजनासह अज्ञात तिघीजनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहाजी हनुमंत हुलगे वय 25 राहणार बेंबळे यांचे टाकळी तालुका माढा येथे कृषी दुकान असल्याने ते टाकळी वरून सायंकाळी दुकान बंद करून बेंबळे कडे निघाले असता वैभव बाळू गायकवाड व इतर तिघेजण दोन मोटरसायकलवर येऊन हुलगे यांना मोटरसायकल आडवी घालून काठीने मारहाण करून लागले चौघानीही तोंडाला रुमाल बांधले होते. हुलगे यांना खाली पाडले यांच्या जवळील पन्नास हजार रुपये रोख ,चाळीस हजार रुपयांची बारा ग्रॅमची सोन्याची चेन, पैशाचे पाकीट,दोन एटीएम कार्ड असे मिळून नव्वद हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला या झटापटीत एकाचा रुमाल खाली आला. त्यामुळे तो वैभव बाळू गायकवाड असल्याचे ओळखता आले. मोबाईल मात्र खिशातून उडून पडल्याने तो त्यांच्या हाती लागला नाही ,ते निघून गेल्यानंतर मोबाईल शोधून हुलगे यांनी इतरांना बोलऊन त्याच्या मदतीने टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गायकवाडसह चौघाजनावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपपोलीस निरीक्षक काशीद करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा