नळदुर्ग पत्रकार संघटनेचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे वार्षिक दिनदर्शिका काढण्याचे काम कौतुकास्पद असुन सामाजिक कार्यातही शहर पत्रकार संघाचे योगदान मोठे आहे असे नगरसेवक शहेबाज काझी यांनी पत्रकार संघाने काढलेल्या २०२२ या वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलतांना म्हटले.
गेल्या अनेक वर्षांपासुन नळदुर्ग शहर पत्रकार संघ वार्षिक दिनदर्शिका काढुन ती संपुर्ण तालुक्यात मोफत देते. या दिनर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंनर्शिकेत आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात साजरे होणारे सण, उत्सव, जयंत्या, उरूस यांचा समावेश या दिनर्शिकेत असतो त्यामुळे नागरीक या दिनदर्शिकेचे दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक नागरीकाला ही दिनदर्शिका मोफत दिली जाते.
नळदुर्ग शहर पत्रकार संघाने काढलेल्या २०२२ या वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम दि.२० जानेवारी रोजी नळदुर्ग (मैलारपुर) येथील ऐतिहासिक व प्राचीन जुन्या श्री खंडोबा मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शहेबाज काझी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, नगरसेवक नितीन कासार, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपाचे पद्माकर घोडके,माजी नगरसेवक सुधीर हजारे आदीजन उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री खंडोबाचे पुजन करण्यात आले. यानंतर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, तानाजी जाधव, विलास येडगे, उत्तम बनजगोळे, अमर भाळे,लतिफ शेख, मुजम्मील शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी बोलतांना शहेबाज काझी यांनी म्हटले की, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. पत्रकारांच्या लेखणीतुन समाजाचा आरसा समोर येतो. वार्षिक दिनदर्शिका काढुन ती मोफत वाटप करण्याचे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम श्रमिक पोतदार, सुधीर पोतदार आणि त्यांच्या टीमने अतीशय उत्कृष्टपणे केले आहे. मंदिराच्या उर्वरीत जीर्णोद्धाराच्या कामास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, नगरसेवक विनायक अहंकारी यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे,शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, एस. बी. आर. चे माजी अध्यक्ष नवल जाधव,युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,सुजीत बिराजदार, नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले, बंडप्पा कसेकर, मनसेचे शिवाजी सुरवसे,तानाजी सावंत,राजेंद्र मोटे, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सचिव सुनिल गव्हाणे,उपाध्यक्ष आयुब शेख, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक,दादासाहेब बनसोडे, लतिफ शेख, जहीर इनामदार, अजीत चव्हाण,मंडप काँट्रॅक्टर कानडे आदीजन उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा