Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

भारतीय जनता युवा मोर्चा,धाराशिव आयोजित भारतीय जनता पार्टी कार्यालय धाराशिव (प्रतिष्ठान भवन) येथे बैठक संपन्न .*



*भारतीय जनता युवा मोर्चा,धाराशिव आयोजित भारतीय जनता पार्टी कार्यालय धाराशिव (प्रतिष्ठान भवन) येथे बैठक संपन्न .*


महाविकास आघाडीचा राज्यात चाललेला भोंगळ कारभार ,विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक )विरोधी आंदोलन या बाबत जनतेने आवाज उठवावा -अमोल निदवडे युवा मोर्चा जिल्हा प्रभारी यांनी धाराशिव येथील युवा मोर्चा बैठकीत भावना व्यक्त केल्या .
तसेच संघटन मजबुत करणे ,युवा वोरीयर्स शाखा स्थापन करणे या अनुषंगाने युवा मोर्चाची आगामी काळातील भूमिका युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अमोल निदवडे यांनी मांडली 
भारतीय जनता युवा मोर्चा,धाराशिव आयोजित हि बैठक भारतीय जनता पार्टी कार्यालय धाराशिव (प्रतिष्ठान भवन) येथे संपन्न झाली.

भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठकीमध्ये नूतून प्रभारी अमोलजी निडवदे यांना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी मागील काही महिन्यातील स्थानिक तसेच प्रदेशाचे कार्यक्रम कार्याचा अहवाल दिला. यामध्ये जिल्ह्यात राबवले गेलेले उपक्रम, आंदोलने ,तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूकीच्याकाळात युवा मोर्चा आणखी आक्रमकपणे  सहभागी राहील व  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकित जास्तीत जास्त जागा युवा मोर्च्या चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपलब्ध करून देऊ असे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी अश्वस्त केले.

सोबतच भारतीय जनता पार्टी माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पक्ष वाढवण्यासाठी   युवकांनी जास्तीत जास्त प्रयत्नशील ,प्रवास करावा ,लोकांच्या सहवासात सारखे राहावे असे बोलले व विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  

तसेच पंजाब मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बरोबर जो जीवघेणा डाव काँग्रेस पंजाब सरकारने साधण्याचा प्रयत्न केलता त्या बद्दल जिल्हा धाराशिव युवा मोर्चाने जाहीर निषेद व्यक्त करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा पूजन करून काँग्रेस सरकारला सदबुद्धी देओ असा आव्हान केले ,
तसेच या बैठकीत सुरज शेरकर संघटन सरचिटणीस ,अजित काकडे सरचिटणीस ,स्वप्नील नाईकवाडी जिल्हा उपाध्यक्ष ,सुजित साळुंके धाराशिव शहर अध्यक्ष ,गणेश भोगील जिल्हासचिव या युवमोर्च्याच्या  पदाधिकारींची निवडी करण्यात आले ,
तसेच यावेळी सिंधूताई सपकाळ, शिवसैनक  दत्तात्रय वऱ्हाडे, महिला मोर्च्या च्या मंजुषा कोकीळ यांना बैठकी दरम्यान सर्वांच्या उपस्थित आदरांजली वाहली

यावेळी बैठकीस उपस्थित भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, नूतून प्रभारी अमोलजी निडवदे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर ,बस्वराज रोडगे,भाजप संघटन सरचिटणीस नितीन भोसले,  चिटणीस विकास कुलकर्णी ,उपनगर अध्यक्ष अभय  इंगळे ,भाजप शहर अध्यक्ष राहुल काकडे,मकरंद पाटील ,प्रवीण पाठक ,पांडुरंग पवार ,पूजा देडे, देवकन्या गाडे,यांच्यासह  युवा मोर्चा जिल्हा ,तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा