उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे महाआरोग्य शिबिर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन एच एम) अंतर्गत आदिवासी भागातील रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे भव्य मोफत ऑपरेशन महाआरोग्य शिबीर दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत तपासणी करून निवड झालेल्या रुग्णांची दिनांक १२ ते १४ जानेवारी या दरम्यान आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
सदरील शिबिरामध्ये तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टर फिजिशियन सर्जन स्त्रीरोग तज्ञ दंतचिकित्सक नाक कान घसा नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुरुगोविंदसिंगजी रुग्णालय नांदेड आरोग्य संस्थेतील सर्व विशेष तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
या शिबिरात हायड्रोसिल अंडवृद्धि हर्निया अपेंडिक्स गर्भ पिशवीचा कॅन्सर चे निदान व पुढील उपचार शरीरावरील गाठी च्या शस्त्रक्रिया व शालेय मुलांच्या नियोजित शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व शस्त्रक्रिया रक्तदाब मधुमेह हृदयविकार तसेच एच एल एल महालॅब्स द्वारे रक्तातील तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
किनवट व परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा