*बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ,कोमलताई साळुंखे (ढोबळे) यांचा तुळजापूर येथून महाराष्ट्र दौऱ्यास प्रारंभ*
दि,०१ जानेवारी २०२२, रोजी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ,कोमलताई साळुंखे ढोबळे,यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्याला प्रारंभ केला आहे, पदाधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे कोमलताई साळुंके ढोबळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या,यावेळी प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, संजय महापुरे, सोमनाथ कांबळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा