मर्जीतील ठेकेदारांना बी.डी,एस. प्रणालीतून नियमबाह्य बिले अदा
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळा कारभार
महाड – प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharashtra
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड कार्यकारी अभियंता महाड यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन व रोहा या उपविभागामधील अनेक कामांच्या निविदा प्रक्रिया अद्याप अपूर्ण अवस्थेत असतानाच ३१ डिसेंबर रोजी अनेक एजन्सी धारकांना बी.डी.एस. द्वारे (बजेट डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) कागदोपत्री मर्जीतील ठेकेदारांना बिले अदा करण्याचे काम कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयातून झाले आहे
राज्याचे आर्थिक वर्ष मार्चअखेर संपत असले तरी ३१ डिसेंबर रोजी वर्षाच्या अखेरच्या दिवशी जी कामे पूर्ण झालेत किंवा प्रगतिपथावर आहेत अशा एजन्सी धारकांना केलेल्या कामांची बिले अदा करण्याचे काम करण्यात येते मात्र या नियमाला हरताळ फासून महाड सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयातून ४८ एजन्सी धारकांना अंदाजे ९ कोटी रुपयांची बिले कागदोपत्री बी.डी.एस. करून अदा करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयातून ३१ डिसेंबर रोजी ३०५४०१११ दुरुस्ती व दळणवळण या लेखाशिर्ष खाली रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर माणगाव रोहा व श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या महापुरातील शासकीय वसाहती न्यायालय नगरपालिका नगरपंचायती विविध शासकीय कार्यालय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहती पोलीस ठाणे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व निवास स्थाने तहसीलदार प्रांत व वनखातेयांची कार्यालय व निवास स्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालय शासकीय विश्रामगृहे व कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची निवासस्थाने व रस्ते ब्रिज लहान साकव यांची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने कामे हाती घेण्यात आली होती.
या कामांची अद्याप निविदा प्रक्रिया प्रलंबित असताना तसेच अनेक कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश नसतानाही ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यंत कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयातून बी.डी.एस. करण्यात आले. यात गमतीचा भाग म्हणजे ज्या कामांची बिले अदा करावयाची आहेत तिबिले शाखा अभियंत्याने तयार करून उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयातून कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात पाठवली जातात मात्र येथे अशी कोणतीच प्रक्रिया पार न पडता बी.डी.एस. करण्याचा उद्योग करण्यात आला. विशेषता कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात बिले आल्यानंतर सदर कामांची बिले पाहूनच बी.डी.एस. केले जाते मात्र अंदाजपंच रक्कम पाहूनच बिले आदा केली
बीडीएस झाल्यावर सीएमपी गरजेचे नाही का?
ज्या एजन्सी धारकांना बी.डी.एस. केले जाते त्यानंतर लागलीच सी.एम.पी. केले जाते (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) ज्या महिन्यात बी.डी.एस. केले जाते त्याच महिन्यात सी.एम.पी. (cmp) करणे गरजेचे आहे. मात्र नवीन वर्ष उजाडून आज दुसरा आठवडा आला तरीदेखील बी. डी. एस. चे सी.एम.पी. न करण्याचा उद्योग देखील कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयातून झाला आहे त्यातच ऑडिटर ने बिले न तपासताच बिले अदा करण्याचा उद्योग केला गेला आहे
माणगाव श्रीवर्धन रोहा या तालुक्यांना वगळले?
पुरहानी कार्यक्रमाअंतर्गत कार्यकारी अभियंता शेत्रातील महाड माणगाव, पोलादपूर, श्रीवर्धन, रोहा, या तालुक्यात सदरची कामे काढण्यात आली होती मात्र बी.डी.एस. करताना महाड व पोलादपूर या दोन तालुक्यांना न्याय देण्याचे काम इमानेइतबारे कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार या म्हणीप्रमाणे पुरेपूर फायदा महाड व पोलादपूर उपविभाग आला करून देण्यात आला ३१ डिसेंबरच्या बी.डी.एस. घोटाळ्याचे सूत्रधार उघड होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया महाड सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांकडून ऐकण्यास मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा