Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

बिबट्याच्या पायाचे ठसे नसून,रानमांजर च्या पाऊलखुणा.. वनविभागाचे म्हणणे जनतेने घाबरून जाऊ नये.....


बिबट्याच्या पायाचे ठसे नसून,रानमांजर च्या पाऊलखुणा.. 


वनविभागाचे म्हणणे जनतेने घाबरून जाऊ नये.....

 

श्रीगोंदा:प्रतिनिधी,

श्रीगोंदा तालुक्यामध्ये बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांमध्ये सांगण्यात येत होते. यात वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला असता, हा बिबट्या नसून बिबट्या  सारखा दिसणारा तरस,रानमांजर हा प्राणी असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. मागील दोन दिवसांपासून श्रीगोंदा मांडवगण रोड वरील राऊत मळा जो शहरापासून अगदी जवळ आहे. तेथे बिबट्या दिसल्याची चर्चा सामाजिक माध्यमातून सर्वत्र चालू होती. मात्र, या पाऊलखुणा बिबट्याच्या नसून, रानमांजरच्या असल्याचे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, बिबट्या हा मनुष्यावर किंवा जनावरांच्या मानेवर झडप मारून जखम करतो. त्याच्या पाऊलखुणा ह्या चौकोनी असतात. तसेच श्रीगोंदा तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये उदाहरणार्थ कर्जत, जामखेड, बीड जिल्हा परिसरात जास्त प्रमाणात बिबट्याने मनुष्यावर किंवा जनावरांवर हल्ला केला आहे. त्याच्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्री श्रीगोंदा शहरांमधील मांडवगणरोड राऊत मला,फॉरेस्ट जंगल १०नंबर चारी आहे. तेथे रात्री१ वाजेच्या सुमारास तेथील शेतकऱ्याने फॉरेस्ट च्या दिशेने जात असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्यासारखे वाटले. त्याने लगेच त्या ठिकानच्या फॉरेस्ट अधिकारी भारत लोखंडे यांना कल्पना दिली. .

घटनास्थळी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना रात्री तसे आढळून आले नाही. मात्र, आज दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता वन विभागाचे अधिकारी भोंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल घालमे(वनपाल), संभाजी शिंदे,लोंढे साहेब,भारत लोखंडे,मंडपे भाऊसाहेब यांनी येऊन पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे नसून, रानमांजरच्या पायाचे ठसे असल्याचे निदर्शनास आले. विठ्ठल घालमे (वन परिमंडळ अधिकारी प्रादेशिक श्रीगोंदा), संभाजी शिंदे (वन कर्मचारी) यांनी पाहणी केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यामधील जनतेला घाबरून जाऊ नये, रात्री – अपरात्री घराबाहेर फिरू नये, आपल्या घरच्या व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

याठिकाणी पत्रकार नितीन रोही, पोपट आळेकर,ज्ञानदेव लबडे,रोहिदास राऊत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.

फोटो,2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा