Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

मराठा सेवा संघाकडून जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*



*मराठा सेवा संघाकडून जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*



*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    स्वराज्यप्रेरीका ,राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून उत्साहात साजरी करण्यात आली.
         करमाळा येथे जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन माजी सहाय्यक आयुक्त कोल्हापूर मनपा बाळासाहेब जगताप, मराठा सेवा संघ माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने,तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील ,सचिव सचिन शिंदे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष वैभव माने,शिक्षक संघटनेचे दत्तात्रय राजेजाधव, बाळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत आरेकर,सुमित माने, शकील शेख, आदी पदाधिकारी, जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले.
      यावेळी बोलताना माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने म्हणाले की,  जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे असे दोन छत्रपती घडवून जगाला    लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजे दिले. जिजाऊंनी संस्कार केले म्हणूनच शिवराय घडले.  जिजाऊ शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. मातापित्यांच्या स्वप्नपूर्ती साठी शिवरायांनी आयुष्य पणाला लावले. यावेळी बोलताना माजी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब जगताप म्हणाले की, जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा अत्युच्च मानबिंदू आहेत.शिवराय घराघरात जन्मण्यासाठी जिजाऊ संस्कारांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तालुका सचिव सचिन शिंदे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा