Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून एप्रिल मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी प्रति टन शंभर ते दोनशे रुपये ज्यादा अनुदान- आ.बबनराव शिंदे



विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून एप्रिल मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी प्रति टन शंभर ते दोनशे रुपये ज्यादा अनुदान- आ.बबनराव शिंदे



विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे येथील सन 2021-22 गळीत हंगामात युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे माहे एप्रिल मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी प्रति टन  रू.100/- ते रू.200/- वाढीव अनुदान देणार असल्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना  आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2021-22 चा  गाळप हंगाम जोमाने सुरू असून आजअखेर युनिट नं.1 कडे 10 लाख 30 हजार 920 मे.टन व युनिट नं.2 कडे 3 लाख 20 हजार 052 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामासाठी युनिट नं.1 कडे 20 लाख मे.टन व युनिट नं.2 कडे 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केलेले  आहे. या हंगामातील सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे दि.01 एप्रिल ते 15 एप्रिल,2022 या दरम्यान गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.100/- व दि.16 एप्रिल ते 30 एप्रिल,2022 या दरम्यान गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.200/-प्रमाणे वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने वेळेत ऊस बील, तोडणी वाहतूक पेमेंट देण्याची परंपरा कायम राखलेली असून या हंगामात 31 डिसेंबर अखेर गाळप झालेल्या  ऊसाचे प्रति टन रू.2000/-प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांचे  खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. तरी सन 2021-22 गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ठ पुर्तीसाठी युनिट नं.1 व 2 चे कार्ययक्षेत्रातील सभासद,ऊस पुरवठादार यांनी कारखान्याकडे नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळपास देवून सहकार्य करावे  असे आवाहन त्य�

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा