Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

वडगावच्या (सिद्धेश्वर) येथील पाझर तलाव दुरुस्ती करीता जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब यांना निवेदन*



*वडगावच्या (सिद्धेश्वर) येथील पाझर तलाव दुरुस्ती करीता जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब यांना निवेदन*


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर गावातील मोठ्या पाझर तलाव क्रमांक १ व पाझर तलाव क्रमांक २ तलावाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक झाला असल्याने भविष्यात दुर्दैवी दुर्घटना घडू नये याकरता तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत,
लोकप्रतिनिधी,गावकरी,शेतकरी गेली सहा वर्षे करत असून याचे वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी निवेदन देखील दिलेले होते.

यामुळे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नामुळे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री मा ना शंकरराव गडाख साहेब यांनी पाझर तलाव क्र. २ या तलावास मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत रु २६ लक्ष निधी मंजूर केला आहे.
सदर तलावाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे प्रस्तावित केला होता; परंतु जिल्हा परिषदेकडून एकमेव वडगाव (सि.) येथील पाझर तलाव क्रमांक २ ला निधी उपलब्ध झालेला असताना राजकीय सूडबुद्दीने वडगाव पाझर तलाव प्रशासकीय मान्यतेतुन वगळला असून पाझर तलाव धोकादायक स्थितीमध्ये असल्याने गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यामध्ये तलाव फुटन्याची शक्यता भविष्यात नाकारता येवू शकत नाही

याबाबत जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री मा ना शंकरराव गडाख साहेब याना आज निवेदन देवून चर्चा केली याबाबत साहेबांनी सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर वडगाव सि गावामधील पाझर तलाव क्रमांक ०१ व पाझर तलाव क्रमांक ०२ पाझर तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याकरिता संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हापरिषद (ल.पा) उस्मानाबाद व उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे उस्मानाबाद याना सूचना केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा