Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

तांबवे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हनुमंत ढवळे तर उपाध्यक्षपदी नितीन खटके यांची निवड .


तांबवे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हनुमंत ढवळे तर उपाध्यक्षपदी नितीन खटके यांची निवड
                                    
टेंभुर्णी प्रतिनिधी/   73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तांबवेजिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हनुमंत ढवळे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नितीन खटके यांची निवड करण्यात आली तर शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून सुभाष खटके यांची व तांबवे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून सौ. धनश्री खटके पाटील यांची निवड करण्यात आली  .


         नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार तांबवे ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, तसेच तालुका दक्षता समितीवर विनायक भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला                                यावेळी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून शाळेला व अंगणवाडी ला ॲटोमॅटीक सॅनिटायझर मशीन, वॉटर कुलर, टेबल-खुर्ची, कपाट, भिंतीवरील घड्याळ ,माइक स्पीकर मशीन, वजन काटा, भाषणाचा डायस या वस्तू देण्यात आल्या यावेळी शाळेचे नूतन अध्यक्ष हनुमंत ढवळे यांनी शाळेला आर्थिक सहकार्य म्हणून पाच हजार रुपये रोख स्वरूपात देऊन मदत केली तसेच तांबवे गावातील शाळेमध्ये आता चौथीपर्यंत शाळा असून पुढील काळात पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले व शाळेमध्ये सध्या दोन शिक्षक कार्यरत आहेत तरी पट वाढल्यामुळे तिसरा शिक्षक घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांबवे गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. नागाभाऊ खटके पाटील होते तर मार्गदर्शक म्हणून माजी सरपंच मा.राजाभाऊ खटके पाटील उपस्थित होते.            जिल्हा परिषद पिंपळनेर केंद्रात शाळेचा रंगरंगोटी मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तानाजी ढवळे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.                     कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपसरपंच मा. नागेश बापू खटके पाटील यांनी केले त्यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये गावकऱ्यांना शाळेचा अभिमान असावा असे सांगून पंचायत समिती स्तरावरून शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी माजी सरपंच राजाभाऊ खटके, सोसायटीचे चेअरमन अशोक बप्पा खटके, गोरख खटके सर, डॉक्टर सचिन खटके यांची भाषणे झाली राजा भाऊ खटके यांनी दहा बेंच साठी लागणारे तीस हजार रुपये वर्गणी   देण्याचे जाहीर केले तर गोरख खटके सर यांनी दहा हजार रुपये अशोक खटके यांनी सात हजार रुपये भजनदास नाना खटके यांनी पाच हजार रुपये डॉक्टर सचिन खटके यांनी पाच हजार रुपये व्यसनमुक्त युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय खटके यांनी पाच हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य नितीन खटके यांनी दोन हजार रुपये रोख स्वरूपात देण्याचे जाहीर  केले .      याप्रसंगी गावातील भजनी मंडळ यांना ग्रामपंचायतीच्या वतीने स्पीकर सेट विश्वंभर गोडसे दत्ता गोडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात     आला तसेच 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच सचिन कांबळे व उपसरपंच प्रतिनिधी सुजित भैय्या खटके निवृत्त आर्मी ऑफिसर मेजर संजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.                       तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या व सोलापूर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ धनश्री राजाभाऊ खटके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी कार्यक्रमाला तांबवे गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. नागाभाऊ खटके, माजी सरपंच मा. राजाभाऊ खटके, माजी उपसरपंच मा. नागेश बापू खटके, सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच सुजित भैय्या खटके, भजनदास नाना खटके, अशोक बाप्पा खटके, सुभाष खटके, गोरख खटके, डॉ सचिन खटके, भैरवनाथ शुगर चे शेती अधिकारी विजय खटके, विकास खटके, पोलीस पाटील जयसिंग पाटील, सुधाकर खटके, मधुकर खटके, ग्रामपंचयत सदस्य नितीन खटके, रामभाऊ पाटील, महेश खटके, रणजित देशमुख ,गणेश पाटील, सचिन तळेकर, आबा माने, मच्छिंद्र कांबळे ,गणेश खटके, सुधीर खटके ,बप्पा पाटील, गोटू खटके, सौरभ खटके, वैभव देशमुख, समीर तांबोळी, अमोल साठे, कुठे मॅडम, दादा कांबळे व तांबवे गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी ढवळे सर यांनी केले तर आभार विजय खटके पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा