Breaking

रविवार, २३ जानेवारी, २०२२

नळदुर्गच्या मैलारपुरात खंडोबारायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल.उद्योजक अशोक जगदाळे यांच्या वतीने करण्यात आले



नळदुर्गच्या मैलारपुरात खंडोबारायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल.

उद्योजक अशोक जगदाळे यांच्या वतीने करण्यात आले अन्नदानाच्या महा प्रसादाचे आयोजन .


AJ 24 Taas News Maharastra-प्रतिनिधी:- अजित चव्हाण

नळदुर्ग शहराच्या ऐतिहासिक मैलारपूर च्या खंडोबा रायाच्या पावन  नगरीत येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या जुन्या मूळ खंडोबाच्या मंदिरात समोर दृष्टी समुहाचे उद्योजक नळदुर्ग शहराचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक [ भाऊ ] जगदाळे यांच्या वतीने  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
हाजारो भाविक श्री खंडेरायाच्या दर्शना साठी मैलारपुरात दाखलं झाले .आहेत शिवाय अनेक भावीकानी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे .
खंडोबारायाचे आगमन या मुळ जुन्या मंदिरात झाले याच मुळ जुन्या मंदीरातच खंडेरायाचे व बानूआईचे लग्न झाले त्या  ठिकाणाचे नळदुर्ग येथील गावकऱ्यांनी व भाविकांनी मात्र पावित्र्य ठेवले आहे .खुप मोठ्या प्रमाणात जिर्नोध्दाराचे काम झाले आहे .  जिर्नोध्दाराचे काम प्रगती पथावर आहे . आज रोजी महाराष्ट्र , कर्नाटक, आध्रप्रदेश पर राज्यातुन पण खंडेरायाच्या दर्शनासाठी  हजारो च्या संख्येने  भावीकानी दर्शन घेतले . नळदुर्ग परिसरातील नागरीकानी मात्र शेवटच्या रविवारी खंडेरायाच्या दर्शना पासुन वंचित राहीले नाहीत
भावीक उपास पोटी राहु नये म्हणून . दृष्टी समुहाचे उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या मार्फत अन्नदानाच्या महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी नळदुर्ग शहरातील ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे  सुधीर पोतदार नळदुर्ग  शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, नगरसेवक नितीन कासार , अमृत पुदाले , नवल जाधव ,उत्तम बनजगोळे , तानाजी जाधव 
अमर भाळे , श्रमीक पोतदार , दादासाहेब बनसोडे, उमेश जाधव 
पद्माकर घोडके , सुनिल गव्हाणे दिपक काशीद . शरद बागल सुजित बिराजदार , सचिन भोई , अंकित मगदराव , दत्ता राठोड , मल्लीनाथ गव्हाणे अनेकांच्या उपस्थितीत महाप्रसाचा कार्यक्रम करण्यात आला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा