Breaking

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

वेणेगावात शासकीय कामात अडथळा, तहसीलदार यांना ढकलून देत शिवीगाळ व दमदाटी प्रशासकीय व महसूल अधिकारी, कर्मचारी वर्तुळामध्ये संताप टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपी अटक


वेणेगावात शासकीय कामात अडथळा, तहसीलदार यांना ढकलून देत शिवीगाळ व दमदाटी 

प्रशासकीय व महसूल अधिकारी, कर्मचारी वर्तुळामध्ये संताप 

टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपी  अटक 

*AJ24Taas news Maharashtra Network- आमोल भोसले यांस कडून


टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- माढ्याचे तहसीलदार यांना स्थळ पाहणी केस संदर्भात वेणेगाव या गावात आल्यावर शासकीय कामात अडथळा आणत तहसीलदार यांना ढकलून देऊन त्यांना शिवीगाळ,दमदाटी करीत हाकलून लावल्याची गंभीर घटना माढा तालुक्यातील वेणेगाव येथे १३ जानेवारी रोजी दुपारी ४.०० वा.सुमारास घडली आहे.या घटनेने प्रशासकीय व महसूल अधिकारी, कर्मचारी वर्तुळामध्ये संताप व्यक्त होत आहे.


प्रीती लक्ष्मीकांत काळे (वय-३०) रा.इंदापूर तसेच वेणेगाव सज्याच्या तलाठी यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दि.१३ जानेवारी रोजी दु.४.०० वा.सुमारास माढ्याचे तहसीलदार राजेश मोतीराम चव्हाण हे वेनेगावातील रस्त्याच्या तक्रारी संदर्भात स्थळ पाहणीसाठी वेनेगाव येथे आले होते.त्यांच्या समवेत तहसील कार्यालयातील क्लर्क राहुल भारत शिंदे,वाहन चालक अतुल दहीटनकर,वेणेगावचे कोतवाल उत्तम बबन शिरतोडे व तलाठी प्रीती लक्ष्मीकांत काळे हे सर्वजण व इतरजण उपस्थित होते. अर्जदार आप्पाराव भागवत ढवळे रा.सापटने (टें) हेही उपस्थित होते. 
यासंदर्भात सर्व संबंधितांना अगोदरच नोटीस बजावणी झालेली होती.दि.१३ जानेवारी रोजी दुपारी चार वा.सुमारास सर्वजण शासकीय वाहनाने गट नंबर २०६ मध्ये पोहोचले होते.तेथे वादी अप्पाराव भागवत ढवळे,चांगदेव महादेव जाधव, नागनाथ महादेव शिरसागर व इतर जण अगोदरच हजर होते.
स्थळ पाहणी करीत असताना गावातील व शेजारी असलेला शंकर गोविंद कुटे रा. वेणेगाव हा तेथे आला.त्यास तहसीलदार राजेश चव्हाण यांनी त्यांची ओळख सांगून आम्ही रस्ता केसमध्ये स्थळ पाहणी करता शासकीय स्टाफसह सरकारी काम करण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. यावर शंकर गोविंद कुटे हा तहसीलदार साहेब यांना म्हणाला,कुणाला विचारून तुम्ही आमच्या रानात आला.माझ्या रानातून बाहेर व्हा असे म्हणाला.यावर पुन्हा तहसीलदार यांनी मी तहसीलदार आहे. तुम्ही असे का बोलता असे म्हणताच शंकर कुटे म्हणाला तू कोण का असेना मला काय घेणेदेणे नाही असे म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण यांना त्याने हाताने ढकलून दिले.तेव्हा तहसीलदार चव्हाण यांनी कसाबसा त्यांचा तोल सांभाळला.तसेच शंकर कुटे हा जवळ असलेल्या त्याच्या घरातील बायकांना म्हणाला बायानो बांगड्या फोडा यांना येथून असे जाऊ देऊ नका असे म्हणून तहसीलदार यांना अपशब्द वापरून अर्वाच्य शिवीगाळ,दमदाटी केली.तो बायकांना म्हणाला आपण यांच्यावरच कंप्लेट देऊ. यानंतर ही त्याने सर्व स्टाफ बाहेर येत असताना रस्त्यावरचे गेट लावून पक्षकार यांना बाहेर येण्यास अडथळा केला.तसेच शासकीय कर्तव्य पूर्ण करताना ते पूर्ण होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले अशी फिर्याद वेनेगावच्या तलाठी प्रीती लक्ष्मीकांत काळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.तलाठी काळे यांच्या फिर्यादीवरून कलम ३५३,३४१,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील आरोपीस  अटक करण्यात आलेली आहे

 अधिक तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे बी एस हजारे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा