Breaking

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या..



*नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या..


इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे
       
         बोरी (ता.इंदापूर) या गावात तालुक्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे.नववी मधे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीने बुधवारी दि.१२ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलीय या घटनेने बोरी गाव हादरले आहे. सिद्धी गजानन भिटे रा.बोरी ता.इंदापूर असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
           
      सिद्धी ही बोरी गावातील हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होती. गावातील मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळून जाऊन या अल्पवयीन मुलीने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. सिद्धीने आत्महत्तेपूर्वी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
        
       आई-वडिलांच्या प्रतिमेस धक्का लागू नये म्हणून मी आत्महत्या करत असून 'आब्या' मुळे आत्महत्या करत असल्याचे तिने चिट्ठीत नमूद केले होते.ही चिठ्ठी पोलिसांना व नागरिकांना मिळाली.गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघा मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार नितीन लकडे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा