Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्य व जिल्ह्यामध्ये महाड व माणगाव तालुक्यातील विद्यार्थी अव्वल


शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्य व जिल्ह्यामध्ये महाड व माणगाव तालुक्यातील विद्यार्थी अव्वल

महाड – प्रतीनिधी

पाचवी व आठवी चा राज्य शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्य व जिल्ह्यामध्ये महाड व माणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपला झेंडा रोवला आहे. आठवी मधील ग्रामीण भागात गोरेगाव येथील ना.म.जोशी शाळेचा अथर्व संभाजी खोत हा राज्यात सातवा तर महाड येथील थरवळ कन्या विद्यालयाची मुक्ता राहुल वारंगे राज्यात चोवीसावी आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये  आपल्या तालुक्यात या दोघांनीही प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ५ हजार ८३७ मुले बसली होती. त्यातील ९२४ उत्तीर्ण व ३७५ शिष्यवृत्ती पात्र ठरली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३ हजार ५७६  मुले बसली होती. त्यातील ४८४ उत्तीर्ण व ३५५ शिष्यवृत्ती पात्र ठरली. राज्याच्या आठवीच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये ग्रामीण भागात अथर्व संभाजी यादव सातवा तर रायगड जिल्ह्यात व माणगाव तालुक्यात पहिला आला आहे.तर मुक्ता राहुल वारंगे शहरी भागात राज्यात चोवीसावी आली आहे. तर महाड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात प्रथम आली आहे.

महाड तालुक्यामध्ये ८ वी च्या परीक्षेत ग्रामीण भागात आदित्य अमित सलागरे सेंट झेवियर्स स्कूल शिरगाव  हा नॅशनल रुरल गटात महाड तालुक्यात पहिला तर जिल्ह्यात जिल्ह्यात पाचवा आला.याशिवाय शर्वरी संजय घाडगे ही समर्थ रामदास शाळेची विद्यार्थिनी रुरल जनरल गटात जिल्ह्यात सहावी तालुक्यात व तालुक्यात  प्रथम आली आहे. शंतनु विजय पवार (सेंट झेवियर शिरगाव) रायगड जिल्ह्यात आठवा आला आहे. अर्चना आनंद पाटील (थरवळ कन्या विद्यालय.महाड) रायगड जिल्ह्यात शहरी भागात पाचवी तर  अमेय शिवाजी यादव (परांजपे विद्यालय महाड ) रायगड जिल्ह्यात शहरी भागात आठवा आला आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण भागात भार्गव अमित मेथा (सेंट झेवियर्स स्कूल)याने  रायगड जिल्ह्यात व महाड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वरुण अरुण फडतरे (सेंट झेवियर्स स्कूल)हा रायगड जिल्ह्यात व महाड तालुक्यात दुसरा आहे.

शहरी भागात ओम उदय माने (के.ई.एस. इंग्लिश मिडीयम ) याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी देखील या परीक्षेत मागे राहिले नाहीत. खैरे शेलटोली शाळेतील शिवत्मज पाटील रायगड जिल्ह्यात पाचवा व तालुक्यात तिसरा आला. श्रेया चंद्रकांत तांदळे (रा जि प प्राथमिक शाळा कांबळे तर्फे महाड) रायगड जिल्ह्यात सहावी व तालुक्यात चौथी आली.गार्गी शिवाजी पानस्कर, (सेंट झेवियर्स स्कूल रायगड जिल्ह्यात आठवी व महाड तालुक्यात पाचवी आली. पाचवीला जिल्ह्यात पहिल्या दहा पैकी पाच विद्यार्थी महाड तालुक्यातील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा