'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेच्या जिल्हा युवा उपाध्यक्ष पदावर तात्या शिंदे यांची निवड.....
बेंबळे। प्रतिनिधी। फोटो
'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष पदावर बेंबळे तालुका माढा येथील दशरथ उर्फ तात्या शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल धोत्रे यांचे नेतृत्वाखाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या हस्ते तात्या शिंदे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे संपर्कप्रमुख सुधीर पवार विभागीय जिल्हाध्यक्ष वस्ताद दत्ताभाऊ गायकवाड, करमाळा तालुका अध्यक्ष विकास ननवरे, सोलापूर शहर सचिव देवराज सुकळे, तसेच मनोज शिंदे महावीर शिंदे सचिन शिंगाडे सुनील शिंदे विजय दंडवते आदी प्रमुख मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. फक्त वडार समाज समाजातीलच नाही कर इतर कोणत्याही समाजातील गरजू, गरीब, अशिक्षित, अपंग, निराधार अशा व्यक्तींच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि मदतीसाठी मी सर्वतोपरी कार्य करणार असल्याचा मनोदय तात्या शिंदे आणि नियुक्ती नंतर व्यक्त केला. या निवडीबद्दल तात्या शिंदे यांचे सर्व थरातील नागरिकांतून अभिनंदन होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा