*यशकल्याणी परिवाराकडून बेस्ट सायन्स वाॅल साठी पारितोषिके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील शाळांमधील सायन्स वाॅल च्या रूपाने शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आणि आज त्या सगळ्यांनाच प्रेरित करतात म्हणून यशकल्याणी परिवाराकडून करमाळा तालुक्यातील सर्व शाळा मधून बेस्ट सायन्स वॉल साठी पारितोषिके देण्यात येणार आहेत.अशी माहिती यशकल्याणीचे प्रा.गणेश करे-पाटील यांनी दिली आहे.ही पारितोषिके फक्त करमाळा तालुक्यातील शाळांसाठीच आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना करे पाटील म्हणाले की,यशकल्याणी परिवाराकडून एकूण दहा क्रमांक काढण्यात येतील पारितोषिके खालीलप्रमाणे असतील,
प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रूपये,
द्वितीय क्रमांकासाठी अडीच हजार रूपये,तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रूपये,चतुर्थ क्रमांकासाठी दिड हजार रुपये,पाचव्या क्रमांकासाठी बाराशे रूपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पाच क्रमांक काढण्यात येतील त्यांना प्रत्येकी एक हजार रू.पारितोषिक म्हणून देण्यात येईल. रोख रक्कम,स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन विजेत्या शाळांना विज्ञान दिनादिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल.सहभागी सर्व शाळांना सन्मानपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी शिक्षण विभाग पंचायत समिती ,करमाळा आणि यशकल्याणी संस्था हे परीक्षक म्हणून काम पाहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा