Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

प्रयत्नांमधील सातत्याने हमखास यशाची प्राप्ती होते,- प्राचार्य डॉ मणेर.



प्रयत्नांमधील सातत्याने हमखास यशाची प्राप्ती होते,- प्राचार्य डॉ मणेर.



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.



तुळजापूर, दि,३१,जानेवारी २०२२,रोजी तुळजापुर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या समाजशास्त्र विभागातील प्रा बाळासाहेब कुकडे यांनी समाजशास्त्र विषयामध्ये तसेच  प्रा.अजित शिंदे यांनी एल एल एम या कायदे विषयामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले, यावेळी आयोजित सत्कार समारंभामध्ये बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी वरील प्रतिपादन केले,
  आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी ग्रंथांच्या सहवासात रहाणे आवश्यक आहे.
  यावेळी प्रा ए बी वसेकर,प्रा डॉ बी डब्ल्यू गुंड,प्रा डॉ ए बी गायकवाड,प्रा जी व्ही बाविस्कर *ग्रंथपाल दिपक निकाळजे तसेच प्रा व्ही एच चव्हाण यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा