*थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा :- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*
*लवकरात लवकर नाव समाविष्ट नाही झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू :- तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांचा इशारा*
प्रतिनिधी ( तुळजापूर ) :- थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगप्रसिध्द आहे. सात भाषामध्ये त्याचा अनुवाद आहे . त्यांनी लोनाट्य , कथा , नाटके कादंबऱ्या , चित्रपट , कथालेखन शेतकऱ्यांच्या चालना व्यथा याचे लेखन केले आहे . परिवर्तनाला देणारे समाजसुधारक व लेखक म्हणून ते प्रसिध्द आहेत . त्यामुळे त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यात यावे , अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांनी मंगळवार ( ११ जानेवारी ) तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे . तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात जुबेर शेख यांनी म्हंटले आहे की , संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. असे असताना केंद्र सरकार यांनी महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव नोंद केले नाही . त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो . जे कोणी नाव समाविष्ट होण्यापासून दूर ठेवत आहेत त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करावी व त्वरीत अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे . अन्यथा पुढील काळामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल . असा इशारा जुबेर शेख दिला आहे. यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख, राम थोरात, आंबादास वऱ्हाडे, हनुमंत मडोळे,युनूस सय्यद तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा