जिल्ह्यात 27 फेब्रुवारीला पोलिओ लसीकरण मोहिम
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद,दि.17, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हयात राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील एक हजार 320 लसीकरण बुथवर ग्रामीण आणि शहरी भागातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एक लाख 70 हजार 446 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा समन्वय समिती (प.पो.ल.मो.) यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा