*तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
आज तुळजापूर येथील महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजच्या ऑफीस मध्ये सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाचे मुख्य उपसंपादक प्रदिप नाना मगर यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी जुबेर शेख व सामाजिक कार्यकर्ते अक्षय शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा संपर्कप्रमुख आंबादास वऱ्हाडे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे शरद मस्के, श्रीमंत आबा जाधव, राम सिध्दगणेश, अमर सिध्दगणेश, स्टाफ प्रमुख संतोष दुधभाते, शहर प्रतिनिधी राम थोरात, आबासाहेब शितोळे, सुरेश ठाकर तसेच पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा