Breaking

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

खूनाच्या गुन्ह्यातील 7 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा.”



खूनाच्या गुन्ह्यातील 7 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा.”



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

भुम पोलीस ठाणे : वाकवड, ता. भुम येथील ग्रामस्थ- सचिन व तुकाराम विक्रम येळे, राजेंद्र व हनुमंत महादेव येळे यांसह महादेव लिंबा येळे, विक्रम नामदेव येळे, अंकुश सोमनाथ येळे या सर्वांविरुध्द भुम पोलीस ठाणे येथे खूनासहीत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा क्र. 217 / 2018 नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- श्री. एम.बी. सुर्यवंशी यांनी करुन भुम येथील सत्र न्यायालयात सत्र खटला क्र. 8 / 2019 हा दाखल केला होता.

            या खटल्याची सुनावनी अतिरीक्त सत्र न्यायाधीश क्र.1 मा. श्री. वडणे यांच्या न्यायालयात होउन आज दि. 08.02.2022 रोजी अंतीम निकाल जाहीर झाला. यात उपरोक्त सर्वांना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावन्यात आल्या असून त्या सर्व शिक्षा समवर्तीपने भोगायच्या आहेत.

1) खून- भा.दं.सं. कलम- 302 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा.

2) खूनाचा प्रयत्न- भा.दं.सं. कलम- 307 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा.

3) मारहानीत गंभीर दुखापत करने- भा.दं.सं. कलम- 324 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

4) मारहानीत साधी दुखापत करने- भा.दं.सं. कलम- 323 मध्ये 1 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

5) ठार मारण्याची धमकी देने- भा.दं.सं. कलम- 506 मध्ये 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

6) अवैध जमाव प्रकरणी- भा.दं.सं. कलम- 143 मध्ये 6 महिने सश्रम कारावास. भा.दं.सं. कलम- 147 मध्ये 2  

     वर्षे सश्रम कारावास, भा.दं.सं. कलम- 148 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा