टेंभुर्णी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर .
AJ 24 Taas News साठी कन्हेरगांव /प्रतिनिधी -- धनंजय मोरे
रामरत्न मेडिकल आयोजित पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी , हडपसर पुणे ,संचलित मोफत नेत्र तपासणी शिबिर गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती निलेश ताटे यांनी दिली.
या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये , मोफत नेत्रतपासणी , मोफत चष्मा नंबर काढून मिळेल, मोफत रक्तदाब तपासणी , मोफत शुगर तपासणी, पिवळे रेशन कार्ड धारकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाईल .
हे शिबिर रामरत्न मेडिकल , बेंबळे चौक , टेंभुर्णी तालुका माढा येथे गुरुवारी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत होणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा , असे आवाहन रामरत्न मेडिकलचे निलेश ताटेटे यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा