टेंभुर्णी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन थोरात यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन
टेंभुर्णी प्रतिनिधी/भारत जगताप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे टेंभुर्णी शहराचे उपाध्यक्ष रोहन परविन थोरात यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज पहाटे दुःखद निधन झाल्याने टेंभुर्णी परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे.रोहन थोरात यांचा स्वभाव शांत,संयमी व मनमिळावू असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने जोडला गेला होता. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. टेंभुर्णी येथील अकलूज चौकामध्ये शिवजयंती कार्यक्रमांमध्ये स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.तो ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष होते. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच टेंभूर्णी परिसरावर शोककळा पसरली त्यांच्या पश्चात आई,वडील, बहीण, पत्नी, एक मुलगा (5 वर्षे), एक मुलगी (7 वर्ष) एवढा छोटा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा