Breaking

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

उजनी टे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संगिताताई पाटील यांची बिनविरोध निवड.



उजनी टे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संगिताताई  पाटील यांची बिनविरोध निवड.


राष्ट्रवादीचे  माढा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचे वर्चस्व.....
बेंबळे। प्रतिनिधी।                       फोटो

उजनी टे तालुका माढा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीताताई शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान सरपंच सोनाली संतोष मेटे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.सरपंच पदासाठी संगीताताई शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी सौ कोरबू मॅडम,ग्रामसेवक आर डी यादव,तलाठी चव्हाण यांनी कामकाज पाहिले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सभापती संजय पाटील भिमानगरकर,प्रमुख पाहुणे आढेगावच्या सरपंच श्रीमती चित्राताई वाघ हे होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी उजनी टे ग्रामपंचायतीवर संपूर्ण पॅनल विजयी झाला असून रमेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा उजनी टे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

 यावेळी मा.कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, श्रीमती चित्रा वाघ,रमेश पाटील,दिलीपराव पाटील, सतीश पाटील,कृष्णात पाटील,संतोष मेटे-पाटील, पंडित पाटील,सौ सारिकाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुरकुटे, गणेश बनसोडे,विठ्ठल मेटे, सुशीला पाटील,अनिता माने, कल्याणी गवळी,पंडित पाटील,बाळासाहेब पाटील,दादा मेटे,रमेश पाटील,प्रशांत पाटील, गणेश पाटील,पृथ्वीराज पाटील,किरण मोरे, श्रीकांत पाटील,शिवाजी पाटील,प्रदीपराव पाटील,जालिंदर मेटे,दादा मेटे,सुभाष वायकर, संदिप पाटील,रूषिकेश पाटील,नानासाहेब मेटे,ञिंबक मेटे,शुभम माने,निलेश मेटे, मल्हारी गवळी,सारिका पाटील,वंदना पाटील,शारदा पाटील,मृणाली पाटील,अनिता पाटील,मंदाकिनी पाटील व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा