माजी.आमदार प्रदीप नाईक यांच्या कॉर्नर बैठका
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट :तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक किनवट येथे आले असता राष्ट्रवादीचे युवानेते बालाजी बामणे यांच्या हारे गोविंद मेडिकल येथे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे अमरदीप पाटील कदम यांचा वाढदिवसही माजी.आमदार प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
त्यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,युवानेते बालाजी बामणे, तालुका उपाध्यक्ष बाळू पाटील पवार ,बंटी पाटील जोमदे,कैलास राठोड, दत्ता पवने, गोविंद आरसोड यांच्यासह इंजेगाव, इस्लापूर व प्रधानसांगवी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा