Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली*



*तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली*




प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून आयोजक शिवसेना उपतालुका प्रमुख रोहित नागनाराथराव चव्हाण यांच्या वतीने गावामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,यात गावातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढुन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला हा अनोखा उपक्रम पहिल्यांदाच गावात राबविण्यात आल्याने प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले,या उपक्रमा बद्धल आयोजक रोहित चव्हाण यांच्यावर गावकऱ्यांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रांगोळी स्पर्धेमध्ये हंगरगा तुळ या गावातील महिला युवती तसेच विद्यार्थिनी  उस्फुर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेचे बक्षीस वितरण धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते दि २४,फेब्रुवारी २०२२,रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा