*तुळजापूर शहरवासीय व सर्वपक्षीय यांच्या वतीने भारतरत्न लतादीदींना वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना तुळजापूर शहरात संस्कार भारती ने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली मध्यवर्ती आर्य चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी पुष्पांजली अर्पण करून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांना तुळजापूर येथे संस्कार भारतीच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम पवार शिवसेना शहर प्रमुख सुधीर परमेश्वर संस्कार भारती देवगिरी प्रांताचे विभाग प्रमुख डॉ. सतीश महामुनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन गावडे, सावरकर विचार मंच अध्यक्ष बाळासाहेब श्यामराज तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे , युवक भाजपा तालुकाध्यक्ष आनंद कंदले ,युुवक राष्ट्रवादी माजी अध्यक्ष महेश चोपदार, भाजपचे नेते नागेश नाईक, क्रांतिवीर छावाचे मराठवाडा अध्यक्ष जीवनराजे इंगळे ,तुळजापूर अध्यक्ष कुमार टोले ,जिल्हा चिटणीस भाजपा गुलचंद व्यवहारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी गणेशराव जळके, शिवाजी बोधले, सुहासराव साळुंखे, इंद्रजीत साळुंखे, युवा स्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे, मुख्याध्यापक राहुल कुलकर्णी, संस्कार भारती चे पदाधिकारी अनुक्रमे प्रफुल्लकुमार शेटे, सुधीर आण्णा महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, संतोष डोईफोडे, संदीप रोकडे, प्रसाद महामुनी हेमंत कांबळे, उमेश गवते, मकरंद प्रयाग, गोपाळ चाटूफळे, प्राध्यापक प्रशांत भागवत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, चेतन बंडगर, राजेश देशमुख, दिपक पलंगे, नागेश धर्माधिकारी, प्रसाद शेटे, श्री बगडी ,यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते
लता मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या पैलू मध्ये देशाची सेवा केली संगीत कले सोबत त्यांनी सावरकरांच्या विचारांना दिलेल्या महत्व या अनुषंगाने उपस्थित सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत असताना आपले विचार मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा