Breaking

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

भाजपा यूवती मोर्चाच्या वतीने सुप्रसिद्ध कवयित्री कै सौ दिपमाला देडे यांची प्रथम जयंती साजरी*


*भाजपा यूवती मोर्चाच्या वतीने सुप्रसिद्ध कवयित्री कै सौ दिपमाला देडे यांची प्रथम जयंती साजरी*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


   भाजपा यूवती मोर्चा मराठवाडा उपाध्यक्षा ॲड पूजा देडे यांच्या नेतृत्वाखाली सुप्रसिद्ध कवयित्री, समाजसेवी महान अन्नदाता कै सौ दिपमाला देडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भाजपा यूवती मोर्चाच्या वतीने येथे कुष्ठधाम येथे अन्नदान व मतिमंद मुलींच्या वस्तीगृहात मतीमंद मुलींना जीवनावश्यक वस्तू सॅनेटरी पॅडचे व बिस्किटे वाटप करण्यात आले 
  यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ अर्चना अंबुरे, जिल्हा उपाध्यक्षा अंजली बेताळे   यूवती जिल्हाध्यक्ष पूजा राठोड, यूवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा देवकन्या गाडे, जिल्हा उपाध्यक्षा विदया माने, यू. जिल्हा उपाध्यक्ष स्वाती देडे, तालुकाध्यक्षा सारीका कांबळे, लता पेठे,अनिता क्षिरसागर, मनिषा देडे, सुप्रिया देडे, आरती देडे,ओंकार देडे,अरुण देडे, लोकेश देडे आदिंची उपस्थिती होती
   यावेळी भाजपा यूवती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा ॲड पूजा देडे यांनी कुष्ठरोग्यांच्या व मंतिमंद निराधार व अनाथ मुलींच्या पाठिशी खंबीर उभे राहण्याचे आश्वासन दिले व कै सौ दिपमाला देडे यांच्या अन्नदानाचा वारसा पुढे कायम चालू ठेऊ असे सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा