*तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे ओम श्री शिवशक्ती,११०८ धाम,१००८ शिवलींग मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ,आज दिनांक, ०१ मार्च रोजी, ओम श्री सद्गुरु माताजी ट्रस्ट संचालित शाखा,ओम श्री शिवशक्ती ११०८,धाम,१००८, शिवलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त,भाविकांनी पहाटे १२, वाजता रुद्रभिषेक व महाअभिषेक करून, विधिवत पूजा करण्यात आली,तसेच महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती,यावेळी अध्यक्ष उत्तम वाघ, व जयवंत पाटील उदगीर,यांच्या हस्ते महाशिवरात्री निमीत्त कॅलेंडर प्रकाशन सोहळा करण्यात आला,व प्रत्येक भाविकांना कॅलेंडर भेट देण्यात आले, पुढे बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम वाघ यांनी सांगितले की येणाऱ्या काळात दररोज येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात येईल, व गोशाळा बांधण्यात येईल असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,
यावेळी जयवंत पाटील, व रामेश्वर वैद्य,यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले,यावेळी वैशाली पाटील सह महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते. तसेच दृष्टांत कुंभार यांनी लाईटची व्यवस्था केली होती.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा