Breaking

मंगळवार, १ मार्च, २०२२

उस्मानाबाद येथे लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न*


*उस्मानाबाद येथे लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


   लहूजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष मातंगहृदय सम्राट लहूश्री मा भास्कर शिंदे,साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व  संघटनेच्या संस्थापक सचिव मातंग शेरणी ॲड मा पूजा देडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 

   प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक मा भास्कर शिंदे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांत मातंग समाजाला सर्व स्तरातून सक्षम बनविण्यासाठी राजकीय पक्षांकडून लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देऊन 
न्याय देण्याची मागणी केली व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात निवडणूकीच्या अनुषंगाने मातंग समाजाला दखलपात्र करण्यासाठी बैठका घेऊन त्या अनूषंगाने काम करणार असल्याचे सांगितले.
 तसेच संघटनेच्या संस्थापक सचिव ॲड पूजा देडे यांनी आगामी उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत ८ नगरांमधून ९३ प्रभागांमध्ये १६९ नगरसेवकांमधुन मातंग समाजाचे कमीत कमी ४० उमेदवार देण्यात यावे व समाजाच्या जिल्ह्यातील उपेक्षित प्रश्न तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रलंबित प्रश्नावरही राजकीय नेत्यांचे दूर्लक्ष असल्याचे ‌व जो पक्ष समाजाला न्याय देईल त्याच्याच पाठिशी समाज उभा राहिल अन्यथा समाजाला दुर्लक्षित केल्यास येणाऱ्या विधानसभा-लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना समाज त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असा आक्रमक पवित्रा ताईसाहेबांनी घेतला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा सोपान उकांडे, कोअर कमिटी उपाध्यक्ष मसाजी शेंडगे,ज्येष्ठ नेते,अंकुश पेठे ज्ञानेश्वर कदम तालूकाध्यक्ष रामेश्वर देडे, तालुकाध्यक्षा लक्ष्मी भिसे, तालुकाध्यक्षा मंगल कांबळे, समाजसेवीका माधूरी गरड, शहराध्यक्षा मनिषा देडे, युवती तालुका उपाध्यक्ष धनश्री मगर, तावजी क्षिरसागर शाखाध्यक्ष दिपक खंडागळे, दिपक शिंदे, लक्ष्मण पारधे, कुमार देडे,शशिकांत लोंढे, संगीता गायकवाड, तारामती मगर,मनिषा सुतार, रोडगे दादा, लोकेश देडे, ओंकार देडे, आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा