Breaking

मंगळवार, १ मार्च, २०२२

धनगर समाजाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांचा आरोप*



*धनगर समाजाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांचा आरोप*



ठाणे दि : राज्यात दोन कोटीच्या आसपास धनगर समाजाची लोकसंख्या आहे अनेकदा मागणी करूनही एसटी प्रवर्गातील आरक्षण आजपर्यंत शासन देऊ शकले नाही धनगर समाजाचा वापर फक्त राजकीय स्वार्थ साधण्याचे काम अनेक वेळा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने केले असल्याचा आरोप यशवंत सेनेचे सरसेनापती माधव भाऊ गडदे यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत केला


 यशवंत सेना आणि नवी मुंबई धनगर समाज विकास संस्थेच्या वतीने वाशीतील आर्य समाज सभागृहात पत्रकार परिषद व भव्य धनगर समाजाच्या मेळाव्यात माधव गडदे बोलत होते यावेळी यशवंत सेनेचे खजिनदार बाळासाहेब मोटे, स्वामिराव घोडके,हरिदास लेंगरे,अभय वाघमारे,रामचंद्र बंदीछोडे, उद्योजक महादेव कोळेकर कृष्णा मासाळ, बाळासाहेब पुकळे, धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,तुषार धायगुडे,बाळासाहेब चेंडके, अभय बदीछोडे, स्नेहलता खांडेकर,धनाजी आलदार व आयोजक नवी मुंबई यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित कोकरे,नवी मुंबई धनगर समाज विकास संस्थेचे अध्यक्ष सिद्धलिंग बुरानपुरे ,बरगली चेंडके आदी मान्यवर उपस्थित होते


 यशवंत सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अभिजित कोकरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की नवी मुंबईत जवळ जवळ ४० लाख धनगर समाज वास्तव्यास आहे परंतु पालिकेच्या तीस वर्षे इतिहासात पालिकेत धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी दिला नाही,ज्या अहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध मंदिरे घाट यांचा जीर्णोद्धार केला त्यांचे साधे स्मारक किंवा भवन देखील या नवी मुंबईत नाही. तसेच सिडको किंवा पालिकेच्या आस्थापनेवर नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीपुरता समाजाचा वापर करत आला आहे त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत छोट्या-मोठ्या संघटना एकत्र येत आगामी निवडणूक लढू असा निर्धार त्यांनी केला.


 धनगर समाजाच्या मेळाव्यास नवी मुंबईतील एक हजारापेक्षा जास्त समाजाचे घटक उपस्थित होते मेळावा पार पाडण्यासाठी नवी मुंबई यशवंत सेनेचे पदाधिकारी नवी मुंबई धनगर समाज विकास संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम व पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा