Breaking

शनिवार, २६ मार्च, २०२२

चव्हाणवाडी वि.का.सेवा.सहकारी सोसायटीच्या प्रारूप मतदार यादीवर दावे हरकती झाल्या प्राप्त



चव्हाणवाडी वि.का.सेवा.सहकारी सोसायटीच्या प्रारूप मतदार यादीवर दावे हरकती झाल्या प्राप्त


चव्हाणवाडी/ प्रतिनिधी धनंजय भोसले

संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चव्हाणवाडी सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे.
दिनांक 9 मार्च 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून यादीवर आक्षेप अगर दावे दाखल करण्यासाठी 21 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती.


त्यानुसार सोसायटीच्या काही सभासदांनी आम्हाला कोणतीही नोटीस अथवा कल्पना न देता आमचे 38 सभासदांचे सभासदत्व रद्द केले असल्याबाबतची हरकत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
दिलेल्या हरकत आक्षेपामध्ये मे.जॉइन्ट रजिस्ट्रार, पुणे यांचे कडेही सभासदत्व रद्द केलेल्या आदेशाविरुद्ध अपील प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या निकालापेक्षा दावे हरकतीच्या निर्णयावर चव्हाणवाडी सोसायटीचे भवितव्य अवलंबून असल्याने 30 मार्च रोजीच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांच्या सुनावणीअंती निर्णयाकडे सोसायटीच्या सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोसायटीची अंतिम मतदार यादी 4 एप्रिल रोजीप्रसिद्ध होणार आहे.
राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या चव्हाणवाडी वि.का सेवा सह.सोसायटी निवडणुकीमध्ये गावच्या राजकारणात कायम एकमेकांचे विरोधक असणाऱ्या दोन प्रस्थापित गटांनी गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घरोबा केला असला तरी याही होऊ घातलेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे.
असे झाल्यास दोन्ही एकत्रित गटांना शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सुभाष बापू इंदलकर तसेच सोसायटीच्या तसेच इतर माध्यमातून चव्हाणवाडी च्या राजकारणात किंगमेकर ठरलेले राहुल चव्हाण दोन्ही पार्ट्या ना शह देऊन एक ग्रामपंचायत जागा आणण्यास यश आले आहे .आता चव्हाणवाडी विकास सोसायटी मध्ये दोन्ही गटाच्या  विरोधात दोघेही स्वतंत्र पार्टी उभा करून गावच्या राजकारणात कायम रंगत निर्माण करणार असल्याचे चित्र दिसत असले तरी सोसायटीची निवडणूक झाल्यानंतरच खऱ्या घडामोडी कळतील सध्या चव्हाणवाडी करांचे 30 मार्चच्या निर्णयानंतरच सोसायटीच्या निवडणुकीचा खरा छापा-काटा कळणार आहे त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढत चालली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा