बनावट दागिण्यांच्या आधारे पतपेढीची फसवणूक
आठ जणांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
...........
महाड - प्रतिनिधी
बनावट दागिने सादर करून पतपेढ्यांची फसवणूक करण्याचा प्रकार महाडमध्ये घडला असून येथील शिवकृपा सहकारी पतपेढीची फसवणूक करणाऱ्या आठ जणांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट दागिने देऊन मोठ्या प्रमाणात कर्ज उचलण्याचा दणका यापूर्वी महाडमधील काही पतसंस्थांना बसलेला असतानाच अशाच प्रकारे पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. महाड शहर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबईच्या महाड शाखेमध्ये मूल्यांकनकार म्हणून काम करणाऱ्या सुधाकर विठोबा सागवेकर रा. शिंदेकोंड महाड, यांच्या संगनमताने संदीप किसन पाथरे - नाते, संदेश संदीप पाथरे - नाते, राजेश विठ्ठल यादव - विन्हेरे, सौ. ऋतुजा राजेंद्र जाधव - महाड, राजेंद्र किसन जाधव - महाड, सौ. शिल्पा अशोक नगरकर रा. सरेकर आळी, अक्षय मंगेश बामणे - काचले, यांनी खोटे दागिने देऊन पतपेढी मधून ५५,८७,३०० रुपये उचलून पतपेढीची फसवणूक केली. ही बाब पतपेढीच्या लक्षात येतात पतसंस्थेचे प्रभाकर दशरथ जाधव राहणार - सातारा यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 408, 420, 465, 467, 468, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा