*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आठवले) गट च्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी सोमनाथ भोसले यांची निवड.
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील मा. श्री. सोमनाथ नारायण भोसले यांची RPI च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
ही निवड लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. निवड झाल्याचे समजताच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील मा. सोमनाथ भोसले यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्ह्यास सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकमताने करण्यात आली.
सोमनाथ भोसले हे RPI चे जिल्हा सरचिटणीस पदावर होते, त्यांची समाजसेवेबाबत असणारी उत्कंठता पाहून व जनसामान्यांवरचे प्रेम पाहून त्यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वच स्तरांमधून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे तसेच सदाशिवनगर परिसरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा