डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवमान प्रकरणाचा नळदुर्ग व मुरूम येथे निषेध, आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- सोशल मिडीयाच्या माध्यमातून अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवमान करणाऱ्या जातीयवादी नराधमाचा नळदुर्ग ता.तुळजापूर व मुरूम ता.उमरगा येथे रिपाइं (आठवले) डि.बी.एन.सामाजिक विकास संस्था व भिमराज सरकार ग्रुप मुरुम च्या वतीने नळदुर्ग ता.तुळजापूर व मुरूम ता.उमरगा येथे जाहीर निषेध करून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुरुम ता.उमरगा येथील लखन सत्रे नामक जातीयवादी नराधमाने नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरून त्यांचा आवमान केलाआहे.सदर प्रकार हा निंदनीय असून रिपाइं सह विविध पक्ष, संस्था संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आवमान करणाऱ्या नराधमाचा जाहीर निषेध करून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संबंधित पोलीस ठाणे येते देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, अल्पसंख्या आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीदभाई कुरेशी, रिपाइंचे तालुका संघटक सुरेश लोंढे,दिपक मस्के, नरेंद्र शिंदे,सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, डी.बी.एन.सामाजिक विकास संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, पप्पू कांबळे,
दिलीप भांगे, एस के सुरवसे, विश्वास रणे, अंकुल वाघमारे, धम्मदिप बनसोडे, आकाश झेंडारे, सुशील झेंडारे, सिद्धार्थ बनसोडे, धनराज वाघमारे, किरण कांबळे,भिमराज सरकार ग्रुपचे संस्थापक आनंद कांबळे सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा