आंतर भारती विद्यालय, कुर्डूवाडी येथील इयत्ता 5 वी ची विद्यार्थीनी कु.आरुषी निलेश गवळी भारती विद्यापीठ पुणे स्पर्धा परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम
कुर्डूवाडी : भारती विद्यापीठ पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धा परिक्षेत आंतर भारती शाळेचे 110 विद्यार्थीपैकी 70 विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन मिळवीत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता पाचवीतील कु.आरुषी निलेश गवळी हीने घवघवीत यश मिळवुन महाराष्ट्रात प्रथम येत प्रशालेचे नाव उज्वल केले. यासाठी तिला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मोहन काळे सर, सहशिक्षीका श्रीमती सुचेता शिंदे (क्षीरसागर) मॅडम, वर्गशिक्षक श्री.संजय कांबळे सर, पर्यवेक्षक श्री.मारुती गावडे सर, श्री.संजय सुळे सर, श्री.प्रकाश वाघमारे सर, श्री.चव्हाण सर, श्री.ए.आर.खुणे सर, श्री.दिनेश खुणे सर, सौ.कोळी मॅडम, सौ.मुलाणी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचे यशाबद्दल ग्रामोदय समितीचे अध्यक्ष श्री.पन्नालाल (भाऊ) सुराणा, सचिव श्री.प्रकाश शहा, माजी अध्यक्ष श्री.महादेव (बापू) डिकोळे, माजी अध्यक्ष श्री.हरीभाऊ साळुंके सर तसेच तिचे पालक श्री.निलेश गवळी व सौ.मनिषा गवळी, आजी श्रीमती सुचित्रा नागेश गवळी, काका मंगेश गवळी यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा