Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

अपहरीत मुलाबाबत माहिती देण्याचे, बेंबळी पोलीस स्टेशनचे आवाहन*



*अपहरीत मुलाबाबत माहिती देण्याचे, बेंबळी पोलीस स्टेशनचे आवाहन*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद.दि.14,पोलीस ठाणे बेंबळी येथे 22फेब्रुवारी2022 रोजी निर्मला बाळासाहेब जाधव, वय - 36 वर्ष. रा. कानेगाव, ता.लोहारा. जि. उस्मानाबाद यांनी त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल केली. मुलाचे नाव अनिकेत बाळासाहेब जाधव आहे. अपहरीत मुलाचे वर्णन वय 16 वर्षे 6 महिणे, रंग सावळा, बांधा सडपातळ,उंची170 सेमी, पेहराव फुल बाह्याचा डिझाईनचा राखाडी रंगाचा शर्ट व काळी पँन्ट घातलेली आहे.  पायात काळ्या रंगाची सँन्डल घातली आहे.

अनिकेत बाळासाहेब जाधव यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.पोलीस ठाणे बेंबळी येथे 29/2022 कलम 363 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाचा तपास बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.जी. शेंडगे आणि पोलीस उपनिरीक्षक पी.पी.माने करत आहेत. यावर्णनाच्या मुलाबाबत माहिती मिळाल्यास सहायक पोलीस निरीक्षक एम.जी. शेंडगे8850059270 आणि पोलीस उपनिरीक्षक पी.पी.माने 9673632915 यांना दूरध्वनिवर संपर्क करावे अथवा पोलीस स्टेशन बेंबळी येथे कळवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा