Breaking

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना पंधरा वर्षीय मुलगा गेला वाहून*



*उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना पंधरा वर्षीय मुलगा गेला वाहून*


 टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील भिमानगर येथे पोहण्यास गेलेला १५ वर्षीय मुलगा हातातील दोरी सुटल्याने कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेला असल्याची घटना आज बुधवारी दुपारी २.३० वा. सुमारास घडली आहे.
रोहन सुरेश पवार (वय-१५ वर्ष) रा.भिमानगर असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.उकाड्याने हैराण झाल्याने अनेक तरुण मुले पोहण्यास जात आहेत.त्या प्रमाणे रोहन नागणसुर हा ही बुधवारी दुपारी २.३० वा. सुमारास भिमानगर येथील उजनी धरणाच्या कॅनॉल मध्ये इतर मुलांबरोबर पोहण्यास गेला होता.त्यास पोहता येत नसल्याने तो दोरीस धरून पोहत होता.मात्र पोहत असताना त्याच्या हातातील दोरी सुटल्याने तो गटांगळ्या खात कॅनॉलच्या पाण्यात वाहत जाऊन दिसेनासा झाला.यानंतर स्थानिक नागरिक व मच्छीमार यांनी खूप वेळ त्याचा तपास केला तरीही तो मिळून आला नाही.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या कॅनॉलला तीन हजार क्यूसेस पाण्याचा प्रवाह सुरू आहे.या घटनेची माहिती मिळताच पोनि सुरेश निंबाळकर यांनी पोलीस पथकासह घटना स्थळाची पाहणी केली आहे.कॅनॉल मधील पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
अधिक तपास पोहेकॉ स्वामीनाथ लोंढे व पोना एचए भोसले हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा