पत्रकार सुरक्षा समितीची नळदुर्ग येथे बैठक
आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार
प्रतिनिधी:-अजित चव्हाण
नळदुर्ग:- पत्रकार सुरक्षा समितीची नळदुर्ग येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब बनसोडे होते. या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची नोंदणी पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता इत्यादी विषयावर चर्चा होऊन राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पत्रकारांवरील होणारे हल्ले चिंतनीय बाब असून वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले करत असून बातमी लावण्यावरून जर जीवघेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही अशा माफियांना जशास तसे उत्तर देऊ असे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी बैठकीत म्हणाले.
या बैठकीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख, प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद, अजित चव्हाण, शोएब काझी, आयुब शेख सुनील गव्हाणे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा