जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- मानवाला - माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव -भारतरत्न, ज्ञानसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच अहिंसेचा मार्ग दाखवुन जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंत नगर नळदुर्ग येथे मोठ्या उत्साहात प्रतिमा पूजन व बुद्ध वंदना म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवि माणिक राठोड, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष ज्योतिबा तिबोले, संतोष घाटे, तानाजी गायकवाड, अंकुश लोंढे, मुख्याध्यापक आर.आय.औसेकर, शिक्षक ई.एम. शिरगुरे, एस.जी.कुलकर्णी, बी.टी. वायकर, एच.एम.सुरवसे व व्ही.एल. वाघमारे तसेच अंगणवाडी शिक्षिका संगीता सुरेश राठोड, आशा लक्ष्मण गायकवाड, रोहिणी तानाजी गायकवाड, सुनिता धनराज राठोड व अंगणवाडी मदतनीस, विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा