Breaking

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

उस्मानाबाद येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती ताई पवार यांच्या हस्ते,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थ्यांनाभारत ई कार्डचे वाटप.


उस्मानाबाद येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती ताई पवार यांच्या हस्ते,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थ्यांना
भारत ई कार्डचे वाटप.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती ताई पवार काल उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत ई कार्डचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले...
     या वेळी बोलताना मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत ई कार्ड काढून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा असेही सांगितले....
      या वेळेस प्रमुख उपस्थिती आमदार राणा जगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील,महात्मा फुले योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विजयकुमार भुतेकर तसेच एकनाथ जाधव आणि इतर मान्यवर आणि लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते,या कार्यक्रमाचे जनते मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा