Breaking

रविवार, २४ एप्रिल, २०२२

ऊजनी (टें) सोसायटी निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व*



ऊजनी (टें) सोसायटी निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व



 टेंभूर्णी (प्रतिनिधी)- *भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश काका पाटील व रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली* माढा तालुक्यातील विजयसिंह मोहीतेपाटील विविध विकास सेवा सहकारी संस्था ऊजनी (टें) या गावची वि.वि.का सेवा सोसायटीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक आज  दिनांक २४/४/२०२२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीच्या चेअरमन पदी बाबासो विठ्ठल पानबुडे तर व्हाईस चेअरमन पदी परमेश्वर तुकाराम मेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या संस्थेमध्ये नुतन संचालक आबा तनपूरे,विष्णु पानबुडे,बापू कवडे,मच्छिंद्र घाडगे,महादेव कवडे,अभिषेक तनपूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी नुतन संचालक मंडळाचा सत्कार प्रा सुहास पाटील व सुरेश काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी टाकळी(टें) सोसायटीचे नुतन चेअरमन सारंग घाडगे व व्हाईस चेअरमन अजित घाडगे यांचाही सत्कार करण्यात आला.या निवडीसाठी हरीदास कवडे,परशुराम नवले,संतोष मेटे,कालीदास शिरतोडे यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी दादासाहेब कळसाईत,भाऊराव काळे,कल्याण गायकवाड,सोमनाथ तनपुरे,किशोर शिरतोडे,अमित बनसोडे,मयुर नवले, दिनेश मेटे,विठ्ठल गवळी,भाऊसाहेब लेंगरे,सिद्धेश्वर लोंढे,भिमराव  खंडागळे,आप्पा गवळी,सौरभ लोकरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक व स्वागत प्रा सुहास पाटील यांनी केले.तर आभार संस्थेचे माजी चेअरमन सुरेश काका पाटील यांनी मानले. 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस आर मुंढे  व सेक्रेटरी संतोष कुंभार यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा