Breaking

रविवार, १७ एप्रिल, २०२२

मोरे नर्सिंग होम यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर



मोरे नर्सिंग होम यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : आशा महिला मंडळ गोकुंदा व मोरे नर्सिंग होम यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्मृतीशेष डॉ.यु.बी.मोरे यांच्या स्मरणार्थ मोरे नर्सिंग होम किनवट येथे दि.१८-एप्रिल २०२२ रोजी वेळ सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

किनवट परिसरातील सर्व स्त्री रुग्णांना कळविण्यात येते की,महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्मृतीशेष डॉ.यु.बी.मोरे यांच्या स्मरणार्थ भव्य आरोग्य शिबिरात डॉ.अहसान रियाज जुबेर डॉ.नसरीन जुबेरी डॉ.सौ सुनंदा भालेराव डॉ.मनोज धडसिंग डॉ.अनिल शंकर राठोड डॉ.सौ.प्रियंका अनिल राठोड डॉ.संदेश एम.गच्छे डॉ.प्रियंका संदीप गच्छे डॉ.सौ क्रांती पवन मोरे डॉ.सौ.पूनम प्रशांत मोरे यासर्व विशेष तज्ञ डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची तपासणी चाचणी शस्त्रक्रिया संबंधित तपासणी व सल्ला आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व गर्भवती स्त्री रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक:-मोरे नर्सिंग होम व अरूणादेवी उत्तमराव मोरे अध्यक्षा आशा महिला मंडळ गोकुंदा डॉ.अभिजीत दिवेकर डॉ.सौ.प्रिती दिवेकर (मोरे) सौ.सुप्रिया श्री रुपेश झंवर,पवन उत्तमराव मोरे, प्रशांत उत्तमराव मोरे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा