*सुपे नं.१ शाळेत शाळापूर्व मेळावा संपन्न
आज दिं.२०एप्रिल २०२२ रोजी जि.प.प्राथमिक केंद्रशाळा सुपे नं. १ येथे शाळापूर्व मेळावा आयोजित करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शाळेत शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम गावातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. लेझीम च्या गजरात नवागत मुलांचे व माता पालकांचे स्वागत करण्यात आले. नवागत मुलांचे शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषा विकास गणन पूर्व तयारी व समुपदेशन इत्यादी बाबींची तपासणी करण्यासाठी शाळेमध्ये सात टेबल लावले होते. शैक्षणिक साहित्य त्याचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे विकासपत्र तयार केले. या कार्यक्रमाचा उद्देश स्मार्ट माता तयार करणे हा असून याअंतर्गत माता पालकांनी आपल्या मुलांचा अभ्यास करून घ्यावा हा आहे. या कार्यक्रमासाठी सुपे गावचे सरपंच सौ.स्वातीताई अनिल हिरवे.सर्व ग्रामपंचायत सदस्य. बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. संपत गावडे साहेब. सुपा बीटचे विस्ताराधिकारी श्री. हारे साहेब. केंद्रप्रमुख श्री. हनुमंत चव्हाण साहेब यांनी उपस्थित राहून बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. राहूल पवार तसेच श्री लकडे.इतर सदस्य तसेच ग्रामस्थ पालक अंगणवाडी ताई माता पालक सदस्या इत्यादी उपस्थित होते. तसेच सुपे नं.१ ,च्या मुख्याध्यापिका सौ. संगिता भापकर उपशिक्षिका साधना लोणकर. लता लोणकर. माधवी होनमुटे. निर्मला खेडेकर. वैशाली कुंभार. मनिषा कुतवळ. रेश्मा ठोंबरे. जयश्री नवले. यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.लता लोणकर यांनी केले. तर आभार सौ.संगिता भापकर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा