Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

कनेरगाव विकास सेवा सहकारी सोसायटी कनेरसिद्ध समन्यायी पॅनलचे एक हाती वर्चस्व.



कनेरगाव विकास सेवा सहकारी सोसायटी कनेरसिद्ध समन्यायी पॅनलचे एक हाती वर्चस्व.


टेंभुर्णी प्रतिनिधी-aj24taas News Maharashtra Network

******************************************

 कनेरगाव विकास सेवा सोसायटी 2022- 27 साठी संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये कनेरसिद्ध समन्यायी विकास पॅनल ने कारखान्याचे संचालक शिवाजी डोके -धनंजय मोरे गटाचा धुव्वा उडवत 13 पैकी13 जागांवर मोठ्या मताधिक्याने एकहाती वर्चस्व निर्माण केले.



कोट्यावधीची उलढाल असणारे व गेल्या तीन चार वर्षापासून उत्कृष्ट कारभार करणारी सोसायटी म्हणून कनेरगाव व कनेरगाव परिसरात नावलौकिक आहे या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 20 यादिवशी चुरशीने मतदान झाले यामध्ये 450 मतदार असलेल्या सोसायटीमध्ये 440 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पन्नासते साठ मताधिक्क्याने फरकाने धनंजय मोरे - शिवाजी डोके पॅनलचा धुव्वा उडवत दादा मामा समर्थक असणाऱ्या कनेर सिद्ध समन्यायी सहकारी पॅनलने एक हाती वर्चस्व निर्माण केले.


यात नवनिर्वाचित संचालकांमध्ये सर्वसाधारण मतदार गटातून पॅनलचे प्रमुख श्री लिंबाजी मोरे, दत्तात्रय माने, श्री रामलिंग खोचरे, श्री महावीर मोरे, दत्तात्रय महादेव डोके, उमेश दिलीप डोके ,जयवंत पाटील ,मारुती काशीद, यांची निवड झाली. महिला प्रवर्ग गटातून सौ सुमन दिगंबर केदार, सौ मंगल मोहन भरगंडे यांची तर एस सी प्रवर्गातून अण्णा वजाळे, भटके-विमुक्त गटातून श्री भारत गोसावी यांची निवड झाली. याशिवाय निवडणुकी अगोदरच इतर मागास प्रवर्गातून विष्णू पेटकर यांची बिनविरोध निवड झाली होती.
काही ठराविक लोकांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीमध्ये धनदांडग्यांना व त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना नाकारत गावातील सुजान वैचारिक व सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाणार्‍या समन्यायी गटाला उस्फूर्तपणे साथ दिली व खोडा घालणाऱ्या लोकांना मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवली.
 पॅनलच्या विजयासाठी गावातील जेष्ठ नेते एड.सुभाष मोरे, शरद आप्पा डोके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे, जिल्हा संघटक बाबुराव दादा डोके, विद्यमान उपसरपंच दिपक आबा डोके, तंटामुक्ती अध्यक्ष विकास पाटील,  केदार साहेब, पोलीस पाटील सदाशिव पाटील, हनुमंत पाटील सर, विठ्ठल नाना मोरे, नवनाथ मोरे, धनंजय ढवळे ,पोपट पाटील, ज्ञानेश्वर भरगंडे, Bali डबल आहे का पोलीस पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष राजू डोके, शिवाजी भरगंडे,दादासाहेब खोचरे,अमित खोचरे,हर्षवर्धन माने ,सुरेश पाटील, संजय दादा डोके, अण्णा ताटे ,निलेश ताटे,पद्माकर काशीद, विलास केदार सर, समाधान चव्हाण, वैभव मोरे, सोमनाथ लोखंडे ,अशोक लांडगे, सतीश काशीद ,ईश्वर शिंदे ,तुषार काशीद ,प्रसाद मोरे ,बळी नलवडे, गणेश डोके ,नवा ताटे, दत्ता मोरे, बाळासाहेब शिंदे,विशाल भरगंडे,संपत चव्हाण ,बापू जाधव, सुरेश पाटील, आप्पा सर, मोहन पाटील, योगेश खोचरेयांनी परिश्रम घेतले.
या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे ,करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे ,विठ्ठल गंगा चे चेअरमन धनराज दादा शिंदे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांनी अभिनंदन केले..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा